शासकीय तंत्रनिकेतनमध्ये योग शिबीर आणि प्रश्न मंजूषा स्पर्धा

27

जालना । येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात रसायन अभियांत्रिकी विभागातर्फे महिलांसाठी योग प्रशिक्षण शिबिर आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.प्राचार्य डॉ.एम. डी.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यास अधिव्याख्यात्या तथा समन्वयक अंजुम शेख, सहसमन्वयक सुजाता जगताप,यांची प्रमुख उपस्थिती होती.

आर्य योगा अकादमी चे योग प्रशिक्षक वैभव आर्य, आणि वैष्णवी आर्य यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर करून आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.100 विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. प्राचार्य डॉ. वाघमारे यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. रसायन अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपञकाचे विमोचन तसेच गुणवंत विद्यार्थी अमोल खरात, अमित अडसूळ, प्रतिक तमंचे यांचा सत्कार करण्यात आला.सुञसंचालन अधिव्याख्याता सीमा वाघमारे यांनी केले तर समन्वयक विशाल अंबाळकर यांनी आभार मानले. या वेळी अधिव्याख्याते, कर्मचारी, व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.