जालना । देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी ज्ञानोबा बानापूरे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली कानडे, तहसिलदार संतोष घोरड, तहसिलदार प्रशांत पडघन यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.