“व्हाईस ऑफ जालना” निवड चाचणीत दोनशे स्पर्धकांचा सहभाग।

सांस्कृतिक मंचचे आयोजन, सोमवारी दुसरी फेरी

21

जालना । जालना जिल्हा सांस्कृतिक मंचतर्फे जिल्ह्यातील कलावंतांसाठी आयोजित ” द व्हाईस ऑफ जालना ” स्पर्धेत जालना शहर, विदर्भाच्या सीमारेषेवर असलेल्या ग्रामीण भागासह दोनशे गायक कलावंतांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.

शनिवारी ( ता. 12) जे. ई. एस. महाविद्यालयात उद्योजक कमलबाबू झुनझुनवाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्दघाटन करण्यात आले. या वेळी गायक तथा सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र आडेप, जे. ई .एस. चे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, संगीतकार शैलेंद्र टिकारिया, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कमलबाबू झुनझुनवाला यांनी स्पर्धेमुळे कलावंतांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून आपली कला कसोशीने सिद्ध करावी असे नमूद करत शुभेच्छा दिल्या. राजेंद्र आडेप, डॉ. जवाहर काबरा यांनी मनोगत व्यक्त केले. संगीतकार शैलेंद्र टिकारिया यांनी स्थानिक कलावंतांना योग्य दिशा मिळावी या हेतूने चार चाचण्यांद्वारे अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.अशी स्पर्धा आयोजनाची भूमिका विषद केली. सुञसंचालन मिलींद दुसे यांनी केले तर सिध्दांत टिकारिया यांनी आभार मानले. दिवसभर चाललेल्या निवड चाचणीत दोनशे स्पर्धकांनी मराठी, हिंदी, भाव, भक्तीगीते, गझलांचे सादरीकरण केले. परिक्षक म्हणून सौ. शुभांगी देशपांडे, सौ. ज्योती देशपांडे- जाफ्राबादकर, सुनील शर्मा, प्रकाश कुंडलकर यांनी काम पाहिले. पात्र ठरलेल्या स्पर्धकांची दुसरी फेरी सोमवारी ( ता. 14) सकाळी 11.00 वा. जे. ई. एस. महाविद्यालयात होणार असल्याचे आयोजकांनी कळविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिव्या शाह, मीरा खरात, अक्षय भुरेवाल, श्री. नानावटी,  वीरू आव्हाड हे परिश्रम घेत आहेत.