टाटा सामाजिक विज्ञान संस्थान तुळजापूरकडून कार्डच्या उपक्रमांची दखल

53

जालना । महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसाठी आयोजित कम्युनिटी एंगेजमेंट इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम दिनांक ०७-१२ नोव्हेंबर पर्यंत टाटा सामाजिक विज्ञान संस्थान तुळजापूर येथे सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड जालना संस्थेने १४ वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहितीसह आलेले अनुभव कथन कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांनी केले. अनुभव कथनासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांनी विविध प्रश्न विचारून प्रकल्पामध्ये कम्युनिटी एंगेजमेंट बद्दल माहिती मिळवून घेतली.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS),तुळजापूर आणि महात्मा गांधी नॅशनल कौन्सिल ऑफ रूरल एज्युकेशन (MGNCRE),हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,तुळजापूर चे डीन प्रा.डॉ.रमेश जारे सर यांनी पुष्कराज तायडे यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॉ.संपत काळे सर, प्रा डॉ दिपक अबनावे यांच्यासह महाराष्टातील समाज कार्य महाविद्यालयांचे प्राध्यापक डॉ संजय गवई लातूर,डॉ सुदाम राठोड धुळे,डॉ किर्तिराज भारती विद्यापीठ पुणे, डॉ हेमांगी कडलक एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, डॉ.सिद्धार्थ गंनगाळे यवतमाळ, डॉ.चयन पारधी कर्वे इन्स्टिट्यूट पुणे, डॉ जीवन बारोटे सातारा यांच्यासह अनेक जिल्ह्यातील मान्यवर प्राध्यापकांची उपस्थीती होती.