आ.कैलास गोरंटयाल यांच्या वतीने उद्या दीपावली स्नेह मिलन

55

जालना । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जालना विधानसभा मतदार संघाचे आ.कैलास गोरंटयाल यांच्या वतीने उद्या दि.४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी जालना येथे दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गुरू गणेश भवन मध्ये उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्याचे माजी आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे, काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी माजी आ.नारायणराव पवार, जालना जिल्हा काँग्रेस समिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ.राजेश राठोड, माजी आ.सुरेशकुमार जेथलीया, अरविंदराव चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आ.संतोष सांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील, डॉ. संजय राख, प्रसिद्ध उद्योगपती घनश्यामप्रसाद गोयल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, विनीत सहानी, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते आर.आर.खडके पाटील, फुलचंद भ, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर,सोहेल मौलाना,अंगुलीमाल भंते,जालना मर्चंट बँकेचे चेअरमन अंकुशराव राऊत, अण्णा सावंत,रेव्ह निकाळजे,सगिर अहमद,राजेंद्र हिवराळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव जाधव,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय चौधरी,राम सावंत आदींनी केले आहे.