जालना । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमीत्ताने जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रनचे (3.00 कि.मी. धावणे) आयोजन करण्यात आले होते. या दौडला जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दौडमध्ये खेळाडू, क्रीडा संघटक, अधिकारी, कर्मचारी, क्रीडाप्रेमी, नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथून प्रारंभ झालेल्या या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रूग्णालय, मुक्तेश्वर द्वार ते मोतीबाग मार्गे जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा संघटक फिरोज अली, शेख चाँद पी.जे., प्रमोद खरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख यांनी तर आभार श्री. विद्यागर यांनी मानले.
एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रनमध्ये सहभागी खेळाडूंमधून प्रोत्साहनापर मुलांत विशाल राठोड, अविनाश राठोड, अनिकेत खरात तर मुलींमध्ये कोमल मानकर, किरण पाटोळे, अंजली देशमुख, दिपाली जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते दौड समारोप प्रसंगी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रनमध्ये पोलीस निरीक्षक सर्वश्री. सोनवणे, हिवरेकर, जहागिरदार, गोवर्धन वाहुळे, नितीन जाधव, मंगेश सोरटी, गणेश दाभाडे, ऋषी सिरसाठ, गणेश पैंजने, शेख ईस्माईल, पवन डांगे, शुभम शेळके, अश्विनी सर, गोपाल भोसले, छायाचित्रकार गौतम वाघमारे, बहुसंख्येने खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रेमी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी झाले. एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख, संतोष वाबळे, सोपान शिंदे, हारूण खान, सिमोन निर्मळ आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.