जालना । संभाजीनगर – बिड राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री शिवारात हायवेलगत असलेल्या उसाच्या शेतातुन गोंदी पोलिसांनी जवळपास ३ लाख ३० हजाराचा ३३ किलो गांजा जप्त केला आहे. तसेच एका आरोपीलाही पोलिसांनी अटक केली. सदर कारवाई ही २९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास झाली. रात्री उशिरा गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर-बिड राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री शिवारात उसाच्या पिकात ओळखु नये म्हणून आरोपी रामधन अमृत पवार,रा. सौदलगाव शिवार यांनी बटाईने केलेल्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीसाठी अंमली पदार्थाच्या झाडांची गांजा लागवड लावून संवर्धन करत असताना मिळवुन आला. यात लहान-मोठे असे एकुण २२ झाडे होती. या झाडांचे वजन ३३ किलो होते. या झाडांची किंमत ३ लाख ३० हजार रुपये आढळुन आले. गांजा लागवडीची गुप्त माहिती मिळताच गोंदी पोलिस, महसूल व कृषि पथकाने पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार धनश्री भालचीम, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके, कृषि सहायक गोवर्धन उंडे, जमादार कल्याण आटोळे, सोमनाथ पंचमिरे, विलास वाघमारे, गजानन अवचार, मदन गायकी, महेश तोटे, अशोक नागरगोजे, अशोक कावळे, शहादेव कणसे, अविनाश पगारे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.