टेंभुर्णी । प्रतिनिधी – येथील तक्रारदार यांनी सोलार पॅनल मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता. सोलार पॅनल लावण्यासाठी जागेचा सर्वे करून देण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीचे फिटर, इकोझन सोलर कंपनीच्या दोन कंत्राटी कामगारांनी तक्रारदाराकडून एक हजाराची लाच मागणी करुन ती स्वीकारली. दोघा कामगारांना रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 9 नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी येथे केली.
तक्रारदार यांचे सोलार पॅनल मिळण्यासाठीचे ऑनलाईन अर्जावरून त्याबाबतचा सर्वे करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आरोपी समाधान धोंडीबा लोखंडे, (पद फिटर, इकोझन सोलर कंपनी, पुणे रा. आंबेगाव ता. जाफ्राबाद जि. जालना कंत्राटी) यांच्याकडे आहे. तक्रारदार यांचे सोलार पॅनल मिळण्यासाठीचे ऑनलाईन अर्जावरून त्याबाबतचा सर्वे करून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे आरोपी समाधान लोखंडे याने 1 हजार रुपये लाचेची मागणी करुन, लाचेची रक्कम आरोपी कौसर नसीर शेख, (बाह्यस्त्रोत कंत्राटी, रा. दहेगाव ता. जाफराबाद (कंत्राटी) यांच्याकडे देण्यास सांगितले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक बाळू एस. जाधवर, सापळा पथक पोलीस हवालदार गजानन घायवट, गणेश चेके, भालचंद्र बिनोरकर आदींनी केली.