जाफराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई,दोन आरोपी अटक, तीन लाखाच्यावर मुद्देमाल जप्त

12

जाफराबाद –  पोलिसांनी अहिल्यानगर ( अहमदनगर )व बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून धारदार शास्त्रासह सोन्या दागिन्याचे असे तीन लाख चार हजार ऐवज हस्तगत केला. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरी येणे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदर्श आचारसंहिता चालू असल्याने,सोमवारी जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पठाडेसाहेब, पोलीस कॉन्स्टेबल गावंडे, पोलीस नाईक पठाडे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, चालक डोईफोडे हे पथक जाफराबाद ते माहोरा रोडवर नाकाबंदी करत असताना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाल्यावर, मावर्‍याकडून जाफराबाद कडे पल्सर गाडीवर दोन गुन्हेगार पल्सर गाडीवर येत आहे, तेही भरधाव वेगाने येत असल्याचे त्यांना कळाले. पटकन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याच्या तयारीत होते, पथकाने जीव धोक्यात घालून त्यांना मधोमध अडविले, त्यांना थांबवल्यानंतर त्यांची विचारपूस केल्यावर त्यांची नावे कळाली, 1) रसिकांत रजनीकांत भोसले, वय वर्ष 18, जिल्हा अहिल्यानगर,2) राज बाबुराव पवार, वय वर्ष 20 राहणार बामखेडा, तालुका शिंदखेडा राजा जिल्हा बुलढाणा, त्यांच्या झडती घेतली असता खालील साहित्य सापडून आले. 73 हजार 150 रुपयाची किमतीचे काळे म्हणी सोन्याचे मनी व सोन्याचे पेंडल असलेली पोत, 61 हजार 600 रुपये किमतिची सोन्याची पोत, वीस हजार रुपये किमतीची चांदीची गणेशाची मूर्ती, दोन हजार रुपये किमतीचा चांदीचा लक्ष्मीचा सिक्का, 61 हजार रुपये किमतीचा लक्ष्मीचा फोटो असलेला, हजार रुपये किमतीचा लोखंडी खंजीर, 90 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर, असा तीन लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. 309 /2024 कलम 4/25, शस्त्रआधी सह,124,135, म पो का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी पोलीस कस्टडीत असून तपास चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन डॉ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सपोनी वैशाली पवार, पोलीस उपनिरीक्षक पठाडे, सहाय्यक फौजदार मोरे, हेड कॉन्स्टेबल भापकर, पोलीस कॉन्स्टेबल गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल भुतेकर, पोलीस नाईक पठाडे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, चालक डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल लक्कास, मस्के, जोशी, कवलिंगे,आधींनी ही कारवाई केली.