परतूर । प्रतिनिधी – परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ परतुर शहरातील डॉक्टर्स, फार्मसिस्ट व पॅरामेडिकल (लॅब) असोसिएशन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांनी परतूर मंठा नेर सेवली मतदारसंघात त्यांच्या कार्यकाळात आरोग्य व अन्य क्षेत्रांत झालेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. तसेच डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देऊन सर्व डॉक्टर्स, फार्मसिस्ट व लॅब असोसिएशन यांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे सांगीतले व विकासाला चालना देण्यासाठी विकास, राज्य आणि देशहित समोर ठेवून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.
ह्या बैठकीचे प्रास्ताविक परतूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रमोद आकात यांनी तर सूत्र संचालन परतूर आयएमए सचिव डॉ स्वप्नील बी. मंत्री यांनी केले. यावेळी परतूर डॉक्टर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ जी. एम. बांगड़, डॉ डी. आर. नवल, डॉ पी. के. अंभुरे, परतूर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीन सातोनकर, लॅब असोसिएशन अध्यक्ष श्री अशोक शेळके, फार्मसी असोसिएशन अध्यक्ष दत्ता गिरी, डॉ बी. आर. मंत्री, डॉ संदीप चव्हाण, डॉ प्रफुल्ल गट्टानी, डॉ दिपक कंदोई, डॉ प्रदीप सातोनकर, डॉ सुरुषे, डॉ घुले, डॉ कल्पेश मुंदडा, सुरेश मंत्री, उद्धव निर्वळ, अजीत पोरवाल, राम राठोड, गोविंद मालपाणी, अनिल तेलगड, माऊली भापकर, गजू काकडे, दत्ता सोळंके, मुजमील सय्यद, अतुल पोरवाल, प्रशांत डोम, इम्रान शेख, रमेश खांडेभराड उपस्थीत होते.डॉ सुधीर आंबेकर यांनी उपस्थीत सर्वांचे आभार मानले..