जालना । प्रतिनिधी – रिपबिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे निवासस्थान, डबल जिन, गांधी चमन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. जाहिर झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वाच्या विषयावर चर्च करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रिपबिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची भाजप सोबत युती आहे. परंतु, भाजपने विधानसभा निवडक 2024 मध्ये रिपाईला एकही मतदारसंघ सोडलेला नाही. रिपाईच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये निवडणूकीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
जालना जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदार संघात रिपाईची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणूकीत कुणाला मदत करायची या विषयावर चर्चा करण्यासाठी व त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य संघटक, सचिव अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, अॅड. सिध्दार्थ चव्हाण, विजू खरात, अनिल खिल्लारे, मधूकर बोबडे, मुकुंइ पाईकराव, राहुल आदमाने यांनी केलं आहे.