जालन्यातून भास्कर दानवे यांची अपक्ष उमेदवारी

7

जालना । प्रतिनिधी – जालना विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक 2024 साठी मा भास्कर मुकुंदराव दानवे यांनी आज गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार (दि.24) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी हरकळ साहेब यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भास्कर मुकुंदराव दानवे यांनी अर्ज दाखल करण्याआधी श्री क्षेत्र राजुर गणपती चे दर्शन घेतले तसेच घरून निघतांना त्यांचे औक्षण करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांना विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले. अर्ज दाखल करताना यावेळी त्यांच्यासोबत अशोकआण्णा पांगारकर, सिद्धिविनायकजी मुळे, विमलताई आगलावे, विजयजी कामड हे देखील उपस्थित होते,. यावेळी माजी जि प सदस्य, प स सदस्य, नगरसेवक, सरपंच व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.