मुंबई – महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत अॅड. महेश भताने यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कायदेशीर मार्गदर्शनासंबंधी महत्वपूर्ण ठरणार आहे. अॅड. महेश भताने यांचे नाव कायदेशीर क्षेत्रात प्रतिष्ठित आणि आदरणीय आहे. त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली असून त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यक्षेत्रात होणार आहे.
अॅड. भताने हे कायद्याच्या क्षेत्रात तज्ज्ञ असून त्यांनी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. ‘छाया फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेचे ते सहसंस्थापक आहेत. ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात काम करत असून, अॅड. भताने यांचे योगदान विशेषत्वाने सामाजिक न्यायासाठी आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करताना अॅड. महेश भताने यांच्यावर अनेक जबाबदार्या असतील. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कायदेशीर अडचणी, वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन, तसेच संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल सुचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अॅड. महेश भताने यांची निवड केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला एक तज्ञ कायदेशीर सल्लागार मिळाला आहे, अशी भावना परिषदेत व्यक्त करण्यात येत आहे. अॅड. भताने यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कायदेशीर प्रकरणांचा सखोल अभ्यास होऊन न्यायप्रविष्ट बाबींना नवा दृष्टिकोन प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अॅड. महेश भताने यांनी या नव्या जबाबदारीसाठी आभार व्यक्त करताना सांगितले की, मी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे आभार मानतो. माझ्या अनुभवाचा वापर करून वैद्यकीय व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्याचा माझा सतत प्रयत्न राहील. अॅड. महेश भताने यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कायदेशीर मार्गदर्शन क्षेत्र अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.