मंठ्यातील लिंबखेडा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2

जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेल्या लिंबखेडा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. यात अकरा जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि 20) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना त्यांना मौजे लिंबखेडा शिवारात जुगार अड्डा सुरु असल्याचे माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लिंबखेडा शिवारात रविवार (दि 20) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास छापा मारून कारवाई केली या कारवाईत रामदास भास्कर गायकवाड, वय 40 वर्ष, रा.येवती ता.लोणार जि. बुलडाणा, प्रल्हाद शामराव नागरे, वय 40 वर्ष, रा.येवती ता. लोणार जि. बुलडाणा, समाधान ज्ञानदेव आघाव, वय 43 वर्ष, रा. अंभोरा शेळके, ता. मंठा जि. जालना, राजु रामदास कायंदे, वय 35 वर्ष, रा. येवती ता. लोणार जि. बुलडाणा, सोपान साहेबराव गायकवाड, वय 40 वर्ष, रा. टाकळखोपा ता. मंठा जि. जालना यांच्यासह जुगार अड्डा चालविणारे गजानन राठोड रा. लिंबखेडा ता. मंठा जि. जालना, संतोष म्हस्के रा. लिंबखेडा ता. मंठा जि. जालना तसेच घटनास्थळावरुन वाहनासह पळुन गेलेले 04 जुगारी असे एकुण अकरा इसमांविरुध्द पोलीस ठाणे मंठा येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 5 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.