टेंभुर्णी । प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन क्शन मोडवर आले आहेत सोशल मीडियाद्वारे अफवा पसरून उमेदवाराबाबत आक्षेपार्य मजकूर प्रसारित केल्यास कारवाई सामोरे जावे लागणार असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या ग्रुप डमिन सह नीट करांना नोटीसा देण्यात आल्याचे श्री खामगाव यांनी स्पष्ट केले मतदान आणि प्रचारादरम्यान कोणीही गैरकृत्य करू नयेत तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिलेला आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांच्या सूचनाचे पालन केल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल तसेच ही नोटीस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असेही श्री खामगळ यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील सर्व नेटकरांनी व ग्रुप डमिन यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जाणार नाहीत यासाठी सेटिंग फॉर ओन्ली एडमिन करून घ्यावे जेणेकरून निवडणूक काळात आक्षेपार्य पोस्ट ग्रुप वर येणार नाहीत असे श्री खामगळ यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
कोणत्याही उमेदवाराची कुटुंबीयांची सामाजिक स्तरावरून अवेल न होईल अशी आक्षेपार्य टीका टिप्पणी करू नका
फोटो व्हिडिओ बनवून प्रसारित करू नका अशा पोस्टवर सोशल मीडियात व्यक्तही होऊ नका
मतदारांचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्म जातिबाबत द्वेष पसरणार्या पोस्ट करू नका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन सोशल मीडियावर करू नका
दोन गटात समाजात जातीत वाद निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडिया टाळाव्यात.