भेल व्यवसायिकाची मोती तलावात उडी घेऊन आत्महत्त्या; तीन तासांच्या शोध कार्यानंतर मिळाले तरुणाचे शव

90

जालना । प्रतिनिधी – शहरातील मोती तलावात शहरातली एका भेळ विक्रिचा व्यवसाय करणारे बालाजी शेषराव मैंद या 40 वर्षीय व्यावसायिकाने शुक्रवार (दि 18) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तलावाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडा ओरडा केली असता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाचवू शकले नाही. याची माहिती तात्काळ चंदंनझिरा पोलिसांना दिली मिळालेल्या माहितीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी सुद्धा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तरुण आढळून आला नाही. प्रसंगी घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले व त्यांनी सुद्धा सुमारे तीन तास बालजी मैंद याचा तलाव परीसरात शोध घेतला मात्र ते आढळून आली नाही यावेळी पोलीस प्रशासन व अग्निशामक विभाग व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथांग प्रयत्न केल्यानंतर तीन ते सव्वा तीन तासानंतर बालाजी यांचा मृतदेह आढळून आला नाही रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेख चांद पाशा याला तलावत शोधण्यासाठी पाठवण्यात आले अर्धा तासानंतर बालाजी यांचा मृतदेह आढळून आला आहे, यावेळी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे ,याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे, मात्र या व्यवसायिकाचा मृत्यूने संपूर्ण जालना शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, कारण हा व्यक्ती आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी भेळचे स्टॉल लावून आपला परिवाराचा गाडा हाकलत होता आणि त्याच्यावर ही वेळ का आली. याचीच परिसरात व शहरात चर्चा होत होती.