भराडखेडा येथे श्रीराम कथा व हरिनाम सप्ताह प्रारंभ

29

जालना । भराडखेडा ता. बदनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी ( ता .21) विधिवत व्यासपीठ पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला.
मारोती मंदिर परिसरात दररोज काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, दुपारी 03 ते 04 या वेळेत ह. भ. प. श्री. दिलीप महाराज टेकाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, राञी 08 ते 11.00 या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची हरिकीर्तने यात शनिवारी ( ता.22) विशाल महाराज खोले ( मुक्ताईनगर),रविवारी ( ता 23)गजानन दादा शास्त्री ( अ. नगर), सोमवारी (ता.24) म्हस्के गुरूजी ( संभाजीनगर), मंगळवारी ( ता. 25) संतोष महाराज आढवणे ( कुंभारी), बुधवारी ( ता. 26) सुनीता ताई आंधळे( आळंदी), गुरूवारी ( ता. 27) राधाताई सानप ( बीड),यांची हरिकीर्तने, शुक्रवारी ( ता.28 )सकाळी 11.00 वा. ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सप्ताहाचा समारोप होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन भराडखेडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.