शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी निवेदन, पोलीसांची गस्त वाढवण्याची शिक्षकांची मागणी

7

जालना । प्रतिनिधी – चंंदनझिरा येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर या भागातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी हे प्रचंड दहशतीमध्ये असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने गुरुवार (दि 17) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील सर्व शाळेच्यावतीने चंदनझिरा पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपूत यांना लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा भरतांना व सुटतांना काही रोडरोमियो विनाकारण शाळेसमोर चकरा मारतात, कर्कश होर्न वाजवणे, स्टंट बाजी करणे, झुंड करून शाळेच्या बाहेर उभा राहणे, मुलीकडे पाहून अश्लील इशारे करणे यासर्व प्रकारामुळे मुलींना व महिलांना असुरक्षित वाटत आहे. या समाजविघातक प्रवर्त्ती हे विद्यार्थीनीच्या शिक्षणास बाधक ठरत आहेत. या संदर्भात यापुर्वी सुध्दा चंदनझीरा पोलीस ठाण्यास दि.19 डिसेंबर 2023 या रोजी परिसरातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी निवेदन दिलेले आहे. याची दखल त्यावेळी घेण्यात आली नसल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
या परिसरात अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक व अमानुष अत्त्याचार करून बालिकेला नाल्यात फेकून दिले. या हृदय पिळवून टाकणार्‍या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता परिसरातील रोड रोमियो व समाजविघातक घटकावर बंधनकारक बंदोबस्त करण्यात यावा. शाळा भरतांना व सुटतांना पोलीस गस्त सुरु करावी. पोलीस दादा, पोलीस दीदी उपक्रम सुरु करावा, दामिनी पथकामार्फत विद्यार्थी यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात यावे. पोस्को कायद्याच्या प्रसार व प्रचार जनजागृती आपल्या माध्यमातून करण्यात यावे, या सर्व बाबीचा योग्य तो विचार करून विद्यार्थीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने लवकरात लवकर दखल घेऊन परिसरात पोलिसांची गस्त सुरु करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवेदनावर श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब आबुज, जीवनराव पारे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे, श्री विठ्ठल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी यमुल, ह्विजन ईंग्लिश स्कूलच्या सौ. लता विलास सावंत, मदिना तुल ऊलूम उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जलील, सिल्वर ज्युबली ईंग्लिश स्कुलचे ए एस पवार, श्रीमती ए सी सुर्यवंशी, शहीद एहसान जाफरी उर्दू माध्यमिक शाळेचे अंसारी काशीद, राजू साळवे, शिंदे यांच्यासह ज्ञानदिप प्रा.शाळा, गिरिश ईंग्लिश स्कुल, के.पी.अग्रवाल हायस्कुल, शहिद भगतसिंग विद्यामंदिर आदी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.