जालना । प्रतिनिधी – ऑल इंडिया पयामे इन्सानियत फोरमचे जालना युनिट आणि जम जम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सहाशे जणांची तपासणी करण्यात येऊन औषधीही देण्यात आली.
जुना जालना विभागातील जमजम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
शहरातील तज्ज्ञ डॉ. सरदर्शन मांटे, डॉ. सय्यद सैम, डॉ. अनीजा फातिमा, डॉ. सचिन वाघ, डॉ. श्रीराम वानखेडे, डॉ. आरिफ शेख, डॉ. नावेद बागबान, डॉ. इम्रान खान यांनी रक्तदाब, बालकांचे सर्व आजार, त्वचा, छाती विकारासह सर्व विकारांची
मोफत तपासणी केली. त्यांना योग्य मार्गदर्शन करून मोफत औषधी देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जमजम हॉस्पिटलचे कर्मचारी जहीरभाई, अब्दुल समदभाई पयामे इन्सानियत टीमचे सलीम कच्छी, मुसा मौलाना, अन्सार शेख, जुबेर बावला, मौलाना सय्यद अकील नदवी, सय्यद अहमद, सुफियान मन्सूरी, मुजम्मिल शेख, आझम शेख, आदिल शेख, सय्यद शाहिद, शेख साहिल, सोहेल खान यांनी विशेष परिश्रम घेतले.