जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यासह मराठवाड्यातील ऊपेक्षित वंचित वाईदेशी कुणबी समाजाला राज्य शासनाने तात्काळ कुणबीचे आरक्षण जाहीर करावे अशी मागणी कुणबी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी मांडली आहे.
याप्रसंगी मराठवाङा संपर्कप्रमुख तथा छत्रपती व्हि. के. फाउंडेशन चे अध्यक्ष विष्णू कदम, प्रल्हादराव शिंदे, रामजी सावंत, उद्धवराव सावंत, भगवानराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मौजे खणेपुरी येथे वाईदेशी कुणबी समाजाला कुणबी चे आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन कार्यक्रम चालू केला आहे.
कुणबी सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात प्रमुख पदाधिकार्यांनी हजेरी लावून आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित वाईदेशी कुणबी समाज बांधवांना मार्गदर्शन तसेच काही सूचना समाज बांधवांनी यावेळी मांडल्या आहे. दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीक्षेत्र मौजे खाणेपूर येथे सकाळी दहा वाजल्यापासून समाजबांधवांच्या वतीने धरणे आंदोलन कार्यक्रम चालू करण्यात आलाआहे.
या समाजाचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण राज्य मागासवर्गीय आयोगाने तीन वेळेस तपासले आहे मात्र अद्याप पर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाने या समाजाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला नाही तो अहवाल तात्काळ पाठविण्यात यावा सदरील अहवाल शासनाकडे तात्काळ पाठविण्यात यावा, यासाठी राज्य शासनाने संबंधितांना सूचना द्याव्यात आणि राज्य शासनाने तो अहवाल स्वीकारून तात्काळ वाईदेशी कुणबी समाजाला कुणबी चे आरक्षण घोषित करावे अशी मागणी या वेळीकरण्यात आली.
कुणबी सेना च्या मागणीचा राज्य शासन व विरोधी पक्षातील नेत्यांना य् विचार करावा रस्ता कुणबी समाज येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन विश्वनाथ पाटील यांनी यावेळी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर कुणबी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील,मराठवाडा संपर्क प्रमुख विष्णू कदम, प्रल्हादराव शिंदे कुणबी सेना पालघर, मान्यवर समाजातील प्रमुख पदाधिकारी, उपोषण करते जनाबापू गायकवाड, भगवानराव शिंदे,नामदेव काळे, गणपतराव जाधव, भागवत काळे, सुभाष बिटले, बाबुराव शिंदे, दत्तात्रय टापरे खनेपुरी येथील ग्रामस्थ,पंचक्रोशीतील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वाईदेशी कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी या धरणे आंदोलनात सहभागी झाला होता.