जालना । प्रतिनिधी – जालना विधानसभेची जागा भाजपकडे मिळण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घेऊन प्रदेश भाजपाकडे प्रयत्न करणार असून जालना विधानसभेची जागा भाजप बहुमताने जिंकणार असल्याचा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपा महा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जालना येथे व्यक्त केले.
जालना येथे भाजपाचा महा कार्यकर्ता मेळावा व सदस्यता नोंदणी अभियान हॉटेल गॅलेक्सी येथील गोकुळ लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे पदाधिकार यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जालना विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीवरच जालना विधानसभा भाजपा लढविल्यास भाजपा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. जालना शहरासाठी व ग्रामीण साठी अनेक विकासाचे योजना राबविल्या व 200 कोटी रुपयांचे जालना रेल्वे स्टेशन व 300 कोटी रुपयांचे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशनचे काम चालू आहे.
माजी मंत्री असताना जालना लोकसभा मतदारसंघात 600 कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्याचे कामे केली असून अनेक विकास प्रकल्प जालना शहरात मंजूर केले आहे केंद्र व राज्य शासनाकडून एका कुटुंबाला पीएम,सीएम किसान योजनेचे वार्षिक 12 हजार रुपये, महिलांना वार्षिक लाडकी बहीण योजनेचे 18 हजार रुपये, असे 30 हजार रुपये वर्षाला एका कुटुंबाला केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळत असून अशा अनेक प्रकारच्या जनकल्याणकारी योजना शासन राबवीत आहे येत्या 9 ऑक्टोंबर 2024 रोजी जालना येथील मेडिकल कॉलेजचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की जालना येथील मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी कोणी प्रयत्न केले. विकास कामाच्या जोरावर जालना विधानसभेची जागा भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे मागणार असून त्याला पक्षाकडून मान्यता मिळणार मला विश्वास असल्याचे मत यावेळी श्री.दानवे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी आ. संतोष पाटील दानवे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, सिद्धिविनायक मुळे, चंपालाल भगत, प्रतिक भैया दानवे, भागवत बावणे, कपिल दहेकर, धनराज काबलिये, देविदास देशमुख, सतीश जाधव, संध्याताई देठे, अनिल सरकटे, कैलास उबाळे, राजेंद्र भोसले, अमोल कारंजेकर, शिवराज जाधव, सुनील पवार, वसंतराव शिंदे, शुभांगी ताई देशपांडे, सुनील राठी, शशिकांत घुगे, संजय डोंगरे, बाबुराव शंकरराव भवर, सोमनाथ माणिकराव गायकवाड, रामलाल सुखलाल जाधव, आनंद शिवाअप्पा झारखंडे, सखुबाई गुलाब पणबिसरे, आनंत म्याका, श्रीकांत वसंतराव शेलगावकर, मनोज दविदराव बिडकर, सुमित सुधाकरराव सुरडकर, राजूदादा गवई, अमोल धानुरे, सय्यद इमरान, डोंगरसिंग साबळे, विष्णू डोंगरे, दुर्गेश कुरील, अरुणा जाधव, स्वाती जाधव, वर्षा ठाकूर, ममता कोंड्याल, शरदा काळे, मीना गायकवाड, मनीषा भोसले, गीता राजगुडे, वैशाली बनसोडे, वंदना ढगे, दिपाली बिन्नीवाले, परसराम तळेकर, सुधाकर खरात, ज्ञानेश्वर देव्हडे, बळीराम शिंदे, दत्ता बागल, बद्री वाघ, राहुल इंगोले, योगेश शिमगे, कृष्णा गायके, दत्ता जाधव, नारायण जाधव, चेतन देसरडा, प्रमोद गंडाळ, सुहास मुंडे, विकास कदम, परमेश्वर आप्पा हजबे, सुनील खरे, रामलाल जाधव, योगेश लहाने, अभिजित अंभोरे, सोमेश काबलिये, करण झाडीवाले, प्रभुलाल गोमतीवाले, रवि कायंदे, समर्पण विजयसेनानी, अकबर परसूवाले, शंकर काळे, नागेश अंभोरे, पंडित शिंदे, नामदेव नागवे, गोवर्धन उबाळे, कैलास सोळुंके, कृष्णा खिल्लारे, बद्रीनाथ वाघ, सतीशचंद्र प्रभू, अशोक वाघ, ज्ञानेश्वर राठोड, शरद सोनुने, राजाराम जाधव, भागवत जाधव, उद्धव ढवळे, सागर वाहूळकर, हरिभाऊ गोरे, शिवाजी गायकवाड, सतीश दाभाडे, दिगंबर सातपुते, शाम जाधव, कृष्णा चव्हाण आदींसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.