जालना । प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ जालनातर्फे समाजसेविका आणि प्रसिद्ध लेखिका लॉ. रेखा बैजल यांच्या असामान्य सेवा कार्याचा सन्मान करण्यात आला.
लॉयन्स सेवा सप्ताह आणि नवरात्रोत्सवानिमित्त समाजसेवी व नारीशक्तीचा गौरव करण्यात येत आहे, त्याअंतर्गत क्लबच्या सदस्यांनी रेखा बैजल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला. रेखा बैजल यांनी समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांनी केवळ लेखणीतून समाजाला जागृतच केले नाही, तर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रगण्य भूमिका बजावली आहे. त्यांच्या असाधारण सेवा कार्याची आणि साहित्यिक कामगिरीची दखल घेत लायन्स क्लबच्या अध्यक्षा जयश्री लढ्ढा, संगीता रुणवाल, श्रुती खिस्ते, राजेश खिस्ते, जयप्रकाश श्रीमाळी, आणि अतुल लढ्ढा यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला. यावेळी शिवकुमार बैजल यांनी सर्व लायन्स सदस्यांचे स्वागत केले. हा सत्कार सोहळा क्लबसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला, ज्याने सर्वांना समाजसेवेच्या दिशेने नव्या उत्साहाने प्रेरित केले.