जालना । प्रतिनिधी – येथील शहर महानगरपालिका शहर पथ विक्रेता समितीच्या स्वीकृत सदस्यपदी दिनकर घेवंदे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी केली आहे.
जालना शहर महानगर पालिका प्रशासन चे वतीने काही दिवसापूर्वी शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झाली या निवडणुकीत असंघटित कामगार संघाच्या वतीने नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) पदी दिनकर शंकरराव घेवंदे यांची निवड करण्यात आली ही निवड जालना शहर महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी ही निवड केली आहे. या निवडीचे पत्र उपायुक्त श्रीमती नंदाताई गायकवाड, सह उपायुक्त केशव कानपुडे, शहरअभियान व्यवस्थापक विजय सांगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल शहरातील कामगार, पथविक्रेते, फळ विक्रेते, हातगाडी धारक यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांनी श्री घेवंदे यांचे अभिनंदन केले आहे.