शिवसेनेस 20 टक्के अधिक मतदान मिळवून देणार- अ‍ॅड. भास्कर मगरे

20

जालना । प्रतिनिधी – शिवसना दलित आघाडी जालना विधानसभा मतदार संघातून शिवसेनेस वाढीव 20 टक्के मतदान मिळवून देणार असल्याचा विश्वास शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी बोलून दाखविला.
जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना दलित आघाडीच्या समर्थकांचा मेळावा 1 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आला. यावेळी शिवसेना दलित आघाडी समर्थकांची मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख तथा दलित आदिवासी नेते अ‍ॅड. भास्कर मगरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यात बोलतांना अ‍ॅड. भास्कर मगरे म्हणाले की, काल शिवसेना दलित आघाडीच्या वतीने मी स्वतः लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणप्रसंगी माजीमंत्री शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी भेट देवून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी बोलणे झाले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आदेशाची जिल्हा प्रशासनानी अंमलबजावणी करावी आणि यासंदर्भात 10 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, अ‍ॅड. भास्कर मगरे यांची यासंदर्भात बैठकीचे आयोजन करणत आले आहे.
शिवसेना दलित आघाडीचे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मेळाव्याचे आयोजन झाले आहे. 1 ऑक्टोंबर रोजी जालना विधानसभा मतदार संघातील जालना येथील मेळाव्यात प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना दलित आघाडी 20 टक्के मतदान देणार असल्याचा विश्वास शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख तथा भुमिहिन आदीवासी कास्तकरांचे नेते अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी बोलून दाखविला. यावेळी शिवसेना दलित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.