परतूर । प्रतिनिधी – परतुर तालुक्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजने अंतर्गत 1300 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करण्यात आली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
ते परतुर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्य ग्रहामध्ये संपन्न झालेल्या, संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांना कर्ज वाटप प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की या लाभार्थ्यांमध्ये 65 वर्षे वयापेक्षा अधिक वय असणारे वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग, परित्यक्ता, दुर्धर आजारग्रस्त यांचा समावेश असून श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन यासह विविध योजनातील लाभार्थ्यांना याचा लाभ होणार असून गेल्या पंचवार्षिक पासून आपण स्वतः लक्ष घालून 17000 च्या वर लाभार्थ्यांना पेन्शन सुरू करून दिले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत बालसंगोपन योजनेअंतर्गत परतुर मंठा व जालना तालुक्यातील 600 पेक्षा अधिक अनाथ बालकांना ज्यांना आई किंवा वडील नाही किंवा दोन्हीही नाही अशा अनाथ बालकांना त्यांचा शैक्षणिक खर्च व उपजीविका भागवण्यासाठी प्रति महिना 2200 रू उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यासाठी गटशिक्षणाधिकारी अंगणवाडी कार्यकर्ता अंगणवाडी मदतनीस यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकार्यांनी खूप मोठी मदत झाली असून या मुळे खर्या अर्थाने अनाथांना आधार मिळाला असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की
महिला सक्षमीकरणाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण स्वतः या महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांना कर्ज प्रकरणे मंजूर करून सक्षम बनवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलो आहे यावर्षी देखील परतूर मंठा व जालना तालुक्यातील शेकडो बचत गटांना 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर करण्यात आले आहे त्यातील आष्टी येथील 1 कोटी 10 लक्ष रुपयाच्या कर्जाचे वितरण आष्टी येथे करण्यात आले होते तर आज परतुर येथे 01कोटी 10 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण होत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार लोणीकर म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील सरकार हे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य महिला या सर्व स्तरातील जनसामान्यांसाठी काम करणारी सरकार असून लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये एक लाखाच्या वर महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आर्थिक विकास महामंडळाच्या
कुंकू सौभाग्य महिला बचत गट शिरसगाव 05 लक्ष रुपये, अभिनव महिला बचत गट परतुर 4 लक्ष रुपये, क्रांती महिला बचत गट 9 नऊ लक्ष रुपये, अहिल्या ज्योती महिला बचत गट 5 लक्ष रुपये लक्षपत महिला बचत गट 7 लक्ष 50हजार रुपये लक्ष पद महिला बचत गट 7 लक्ष 50 हजार रुपये, बागेश्वरी महिला बचत गट परतुर 4 लक्ष 90 हजार रुपये, रेणुका माता महिला बचत गट 3 लक्ष रुपये, भीमशक्ती महिला बचत गट 7 लाख रुपये, वैष्णोदेवी महिला बचत गट 9 लक्ष रुपये, राजमाता महिला बचत गट 04 लक्ष रुपये, तुळजाभवानी महिला बचत गट 4 लक्ष रुपये, कोकेश्वरी महिला बचत गट परतुर 3 लक्ष 47000 रुपये, फलक महिला बचत गट 7 लक्ष रुपये, द्यानेश्वर महिला बचत गट 4 लाख रुपये सरस्वती महिला बचत गट 5 लक्ष रुपये आधी बचत गटांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे रमेश भापकर, पद्माकर कवडे संभाजी वारे रवींद्र सोळंके, निवृत्ती लाटे, दिगंबर मुजमुले, रंगनाथ येवले, गजानन लोणीकर गजानन लिपणे गणेश सोळंके रमेश राठोड रमेश राठोड बंडू मानवतकर बाबाराव थोरात श्री गांजाळे सिताराम राठोड, सनी तनपुरे, मधुकर मोरे नसरुला काकड आसिफ कच्ची बबलू सातपुते, माऊली सोळंके, तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी राजेंद्र तांगडे महिला आर्थिक विकास महामंडळाचे उमेश कहाते शैलेश उखळकर सुषमा कुलकर्णी मनीषा कुलकर्णी उज्वला खरात मंगल साकळकर मनीषा हनवते ज्योती नाटकर सुनयना बदनेकर अर्जुन लाये सीमा नाईक संगीता दहिभाते अश्विनी गंगणे यांच्यासह गावागावातून आलेले सरपंच उपसरपंच लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती