प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी जिल्हाच्या दौर्‍यावर

7

जालना । प्रतिनिधी – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्याचे सहप्रभारी कुणालजी चौधरी हे दिनांक 2 आक्टोंबर 2024 बुधवार रोजी जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून जिल्ह्यातील विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार यांच्या अध्यक्षते खाली पाठक मंगल कार्यालय मुक्तेश्वर द्वार जुना जालना येथे बुधवार रोजी दुपारी 4:30 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार डॉ. कल्याणराव काळे, काँगेस पक्षाचे लोकसभेचे निरीक्षक डॉ.पि.सी.शर्मा, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, शेख फरीद, आर आर खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, एड. राम कुराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, या बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सर्व आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, सेलचे जिल्हाध्यक्ष, माजी जि.प.प.स., न.प. सदस्य आणि जिल्ह्यातील सर्व बी.एल.ए. व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शेख मेहमूद यांनी केले आहे.