जालन्याच्या राजवीर सोजे याने तायक्वांदो स्पर्धेत पटकावले सिल्व्हर मेडल !

27

जालना । प्रतिनिधी – तायक्वांदो असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) च्या आयोजित तसेच इंडिया तायक्वांदोच्या अधिपत्याखाली नाशिक येथे सुरू असलेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये जालना येथील राजवीर मदन सोजे याने सिल्व्हर पदक पटकावले आहे. तो अंडर 25 ज्ञस . वेट कॅटेगरी या प्रकारात खेळला आहे.येणार्‍या काळात तो सुवर्ण पदक घेवून भारताच्या संघात खेळू शकतो.त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय पंच मयुर पिवळ यांचे मार्गदर्शन लाभले.राजविरचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याबद्दल संघटनेचे सचिव सचिन आर्य, अशोक पडूळ, प्राध्यापक डॉक्टर विजय कमले पाटील, प्रांजल पिवळ व मार्गदर्शक मयूर पिवळ व सोजे परिवार यांनी अभिनंदन केले.