दलित आदिवासी नेते अ‍ॅड. भास्कर मगरे यांचे लाक्षणिक उपोषण

35

जालना । प्रतिनिधी – दलित आदिवासी नेते तथा शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांचे एक दिवशीय लाक्षणिक (लक्षवेधी) उपोषण 30 सप्टेंबर रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत करणार असल्याची माहिती दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान या लाक्षणिक उपोषणातून शासनाशी चर्चा घडून आणणार असल्याचेही मगरे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तपट्टे नावे करुन सातबारा देण्यात यावा मागण्यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी आंदोलने, मोर्चे, जालना ते मुंबई असे मोर्चे काढलेले आहे. अद्यापही त्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले नसल्याने शेवटी मगरे यांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात जिल्हाधिकार्यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाडा विशेषतः जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तपट्ए नावे करुन सातबारा देण्यात यावा, राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तकरांना शासनाने प्रदान केलेल्या गायरान जमीनी सिलींग अ‍ॅक्टमधील शेत जमीनी, इनामी जमीनी आदी संगणकीय सातबारा करुन लाभार्थ्यांचे नावासमोरील क्षेत्र पोट खराबीमध्ये दाखवत असल्याने लाभार्थ्यांना शासकीय मदतीशिवाय बँकेच्या कर्जापासून वंचित राहावे लागत आहे, त्यामध्ये दुरुस्ती करुन सातबारा क्षेत्र पूर्ववत करण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी, शासनाने घरकुल आवास, रमाई आवास, शबरी घरकुल, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांसाठी घरे- 2022-24 नुसार उपेक्षित समाजातील वंचित घटकाला विशेष प्राधान्य देण्यात यावे, निराधार योजनेतून निराधारांना मासिक देय अनुदान दीड हजारांऐवजी तीन हजार रुपये देण्यात यावे. मौजे पाणशेंद्रा ग.नं. 9 एकुण क्षेत्र 45.71 हे. जमीनीवर स्थानिक आदिवासी भुमिहिनांचे अतिक्रमण 40 वर्षांपुर्वीचे आहे, काहींना सातबारा वर घेतले आहे काहींची नोंद नाही, न्याय प्रविष्ठ प्रकरणात शासनाने हस्तक्षेप न करता सातबारा देण्यात यावा. मौजे गणेशनगर ग.न. 69 (गायरान) न्याय प्रविष्ट प्रकरणात स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप करु नये. जिल्हाधिकारी जालना यांचे 23 जानेवारी 2006 आदेशानुासर मौजे रामनगर (सावरगाव हडप) ता.जि.जालना येथील ग.न. 200 (गायरान) जमीनीवरील लाभार्थी यांचे अतिक्रमण नियमानुकूलित करुन सातबाराला नोंद घेण्याचे निर्देश देवून तहसिलदार जालना यांनी डिसेंबर 2023 मध्ये 8 बेकायदेशिर लोकांच सातबारा उतार्यांवरील नावे कमी करण्याचेही निर्देश देण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी सोमवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे भुमिहिन, कास्तकरांचे नेते अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी सांगितले.