शिवसेना महिला आघाडी मजबुत करा उपनेत्या संजना घाडी यांचे पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन; शिवसेना महिला आघाडीचा स्त्रीशक्ती संवाद मेळावा

7

जालना । प्रतिनिधी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जालना शहरातील शिवसेना भवनात स्त्रीशक्ती संवाद’ मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, पक्ष निरीक्षक प्रियंका घाणेकर व सोनम जामसुदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 27 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, परतुर, घनसावंगी विधानसभा मतदार संघांतील महिला पदाधिकार्यांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, वैैलास पुंगळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर, सुमनताई घुगे, गंगुताई वानखेडे, आयोध्या चव्हाण, शितल गव्हाड, मंजुषा घायाळ, शोभा पुंगळे, पुजा टेहरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना उपनेत्या संजना घाडी म्हणाल्या की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिलांचा प्रचंड आदर सन्मान करणारा पक्ष आहे. महिलांनी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील संघटन मजबुत करावे. एकुण मतदार संख्येत महिलांची संख्या ही निम्मी आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांचे संघटनही बळकट असणे गरजेचे आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवयाचे आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागणे गरजेचे आहे. राज्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार याचा उल्लेख करुन त्यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधार्यांचा खरपूस समाचार घेतला. आगामी सर्वच निवडणुकांत फुटीर व गद्दारांना धडा शिकवावा, असे आवाहन केले.
यावेळी पदाधिकार्यांशी संवाद साधतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, आपल्या घरदार व कुटूंबांची जबाबदारी सांभाळून महिला भगिनी शिवसेना पक्षात मोठ्या हिरीरीने काम करतात. पक्षानेही आतापर्यंत अनेक वेळा त्यांना वेगवेगळ्या पदावर बसून सन्मान केला. आगामी काळात होणार्‍या सर्वच निवडणुकांत महिलांना मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे.
यामुळे महिलांनी शिवसेना पक्षात काम करावे, पक्ष संघटन वाढवावे, असे सांगून त्यांनी उपस्थित पदाधिकारी महिलांचा गौरवपुर्ण उल्लेख केला. शिवसेना पक्ष हा सामान्य, वंचित घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. महिलांनी आपले संघटन वाढवून गावा-गावात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखा सुरु कराव्यात, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबेकरांनी केले. याच कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनीही महिलांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे कौतुक केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, माजी नगरसेविका मिनाताई घुगे, रोहिणी तोगे, शिला शहाने, बेबीताई पावसे, योगिता शिंदे, शितल मुरकुटे, आरती काळे, गयाबाई पवार, कुंतीका भुसारे, लता वेलदोडे, रुख्मिनी घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतुर, अंबड, घनसावंगी तालुक्यातून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा महिला संघटक मंगल मेटकर यांनी केले.