परतूर । प्रतिनिधी – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून भारत देश हा विकसित देशांच्या यादीत जाऊन बसला असून, राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने युवक युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर योजना कार्यान्वित केल्या असून या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
ते नागपूर व वैजोडा पाडळी वस्ती येथे संपन्न झालेल्या सत्कार कार्यक्रमाला उत्तर देताना बोलत होते
महिला सक्षमीकरण हा ध्यास घेऊन लाडकी बहीण सारखी अतिशय महत्त्वकांक्षा व यशस्वी योजना राबवत राज्यातील सरकारने खर्या अर्थाने, महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला असल्याचे सांगतानाच सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यातील जनतेला खर्या अर्थाने दिलासा दिला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की परतुर विधानसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने संघर्ष करत मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत मतदार संघाचा कायापालट केला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की देशासह राज्यातील व मतदार संघातील युवक वर्ग हा खर्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असून भाजपामध्ये रोज येणारे युवकांचे लोंढे हे येणार्या विधानसभेत विजयाची नांदी ठरणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
यावेळी गावकर्यांच्या वतीने प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुल लोणीकर यांचा सत्कार केला
यावेळी शत्रुघ्न कणसे, पद्माकर कवडे भगवान पाटोळे विष्णू डोने, राहुल काळे काकासाहेब शिंदे रामा चव्हाण अरुण वाघमारे, संदीप तनपुरे सुनील गुजर विठ्ठल महाराज जाधव सुनील महाराज बोराडे दत्ता रोकडे उद्धव मांडगे, माऊली शिंदे एकनाथ खामकर गजानन वैद्य कृष्णा रोकडे गोविंद यादव, तुकाराम चव्हाण, आकाश रोकडे, दत्ता जाधव दौलत जाधव विष्णू टोणपे, संतोष बोराडे नारायण दत्ता मांडगे विठ्ठल रायकर, अनंत तुमचे अनंत टोणपे, अर्जुन मांडगे एकनाथ रोकडे कांता गायकवाड, विठ्ठल मस्के बाळू मस्के पिंटू बोराडे पप्पू मस्के राजेश काकडे हनुमान बोबडे रामचंद्र टोणपे अनिल गुजर विठ्ठल पवार राजू वाघ कैलास जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती