राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने ; भाजपा व संघी विचारांना काढून टाकू

21
जालना-भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा याने लोकसभा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज शुक्रवारी रोजी गांधी चमन जुना जालना येथे जालना शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करून जोरदार निदर्शने आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने या घटना प्रकरणी संपूर्ण राज्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपा विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. या अनुषंगाने आज शुक्रवार रोजी खासदार डॉ.कल्याणराव काळे व आ.कैलास गोरंट्याल व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपा आणि संघी विचाराच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की,खासदार राहुल गांधी यांना भाजप नेत्यापासून धोका निर्माण झालेला आहे.काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना बिलकुल घाबरत नाही. केंद्र शासनाने खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षे मध्ये वाढ करून त्यांना अधिक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे नेत्या स्व.इंदिरा गांधी,स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हा इतिहास जनता विसरू शकणार नाही.भाजपा आणि संघी विचार देशासाठी घातक असून समाजामध्ये विष पेरणारे आहे.या विचारांना काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फुले, शाहू,आंबेडकर विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस कल्याण दळे,राष्ट्रीय ओबीसीचे समन्वयक राजेंद्र राख,एड. राम कुऱ्हाडे यांनी आपल्या भाषणातून भाजपाचा निषेध व्यक्त केला. यावेळी वसंत जाधव,नंदाताई पवार,राम सावंत,बासेत कुरेशी,दिनकर घेवंदे,शेख वसीम,शेख शमशोदीन,योगेश पाटील,इकबाल कुरेशी,माजी नगरसेवक महावीर ढक्का,अरिफ खान,बालकृष्ण कोताकोंडा,विनोद यादव,धर्मा खिल्लारे,सुभाष मगरे,सुभाष कोळकर,नारायण वाडेकर,मनोहर उघडे,कृष्णा पडूळ,बाबासाहेब सोनवणे,जावेद अली,रघुवीर गुडे,शेख इर्शाद,गणेश चांदोळे,शेख जावेद लकी,अजीम बागवान,अब्दुल रफिक मुक्तार खान,भागवत धाटे शिवाजी वाघ,बळीराम तिडके,वसीम कादरी,सिताराम तुपे,मथुराबाई सोळंके,मोहम्मद रफीक,प्रमोद आल्हाट यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.