राजे शिवाजी गणेश मंडळकडून स्त्री शक्तीचा सन्मान अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना महाआरतीचा मान

11

टेंभुर्णी – येथील प्रसिद्ध राजे शिवाजी गणेश मंडळाकडून मागील अनेक वर्षापासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामधन पा.कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवणार्‍या राजे शिवाजी गणेश मंडळातर्फे यावर्षी सन्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत शासनाच्या महिला व बालविकास यासंबंधी सदृढ बालक तथा निरोगी व सदृढ माता अभियान, बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण अशा समाजोपयोगी कार्य करणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना महाआरतीचा मान देऊन त्यांच्या महिला व बालकल्याण, शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल मंडळातर्फे यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून गणेश मंडळांनी अशी सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे, समाजाचा विकास समाजाची उन्नती आणि समाजामध्ये अशा सामाजिक उपक्रमाने कार्य केलं पाहिजे हे आजच्या काळाची गरज ओळखून टेंभुर्णी येथील राजे शिवाजी गणेश मंडळाचा उपक्रम हा स्तुत्य असून असे सर्वच गणेश मंडळांनी उपक्रम राबविले पाहिजे ज्यापासून समाजाला फायदा होईल समाजामध्ये बदल घडून येतील. याप्रसंगी, रामधन पाटील कळंबे, पांडुरंग बोरसे, भोपळे सर विष्णू जोशी,इंगळे, राजे शिवाजी गणेश मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते संदीप जाधव, शिवराज सपाटे, आधी सर्व कार्यकर्ते तसेच, सर्व सन्मान केलेल्या अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस यांचे आवर्जून उपस्थिती होती. त्यांना दिलेला सन्मान बद्दल त्या भावुक झाल्या आणि गणपतीने आशीर्वाद दिला अशी त्यांची भावना झाली. तसेच मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.