गणेश ऊत्सवा निमित्त बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल फोन चोरणार्या दोन संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात; सदर बाजार पोलिसांची कारवाई

16

जालना- शनिवारी गणपती बप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस असल्याने बाजारात तुफान गर्दी असल्याचे दिसून आले. गर्दीचा फायदा घेत मोबाईल फोन आणि लहान बाळाच्या पायातील चांदीचे कडे,चैन चोरणार्या दोन संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गणेशोत्सवामुळं जिल्हाभरातून नागरिकांची शहरात येजा सुरु आहे. त्यामुळं बाजारात नागरिकांनी तुफान गर्दी केली. याचाचा फायदा घेत चोरट्यांनी काही नागरिकांचे मोबाईल फोन्स आणि दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार सदर बाजार पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान घाणेवाडी दर्पण वर्तमान पेपरचे संपादक शिवाजी बावणे हे गणपती खरेदी करण्यासाठी बाजारात आले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून मोबाईला फोन लंपास केला होता. यावरून पत्रकार मंडळीने तात्काळ याची खबर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना दिली होती. त्यावरून त्यांनी सदरबाजार पोलीसांना सुचना केल्या असता पोलीसांनी तत्परता दाखवत संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान बाजारातून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतलं. त्यांच्याजवळून चार मोबाईल फोन्स, दागिने आणि रोख सहा हजार रू.रक्कम पोलिसांनी जप्त केले. दरम्यान बाजारातून कुणाचे फोन किंवा दागिने लंपास झाले असतील तर त्यांनी सदर बाजार पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पो.निरि.संदिप भारती यांनी आज दिनांक 7 शनिवार रोजी 06:00 वाजेच्या सुमारास केलं आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपनिरीक्षक नरोडे, जगनाथ जाधव, अजीम शेख, नजीर पटेल, तेजनकर, दुर्गेश गोफने यांनी केली..