जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) चा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. डेूेु-05.50, ॠशीींरिीे, ऋळीश-100, र्डीहरसीर-100 असा प्रतिबंधीत घटक असलेल्या औषधींचा यात समावेश आहे ही औषधी अवैध गर्भपात व कामवासना उत्तेजीत करणारी असुन जवळपास आठ लाख 18 हजार 400 किमतीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत वरिष्ठ अधिकार्यांनी जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना शुक्रवार (दि. 6) रोजी इसम नामे अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख रा.शेरसवार नगर जुना जालना हा भोकरदन नाका परिसरात देशी दारु दुकानाच्या पाठीमागे जालना येथे Aश्रिीरूेश्ररा हा प्रतिबंधीत घटक असलेल्या गोळया विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन स्था.गु.शा.चे पथकाने पंच व अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांचेसह छापा कारवाई करुन अल्तमश शेख याचे ताब्यातुन डेूेु-05.50 या कंपनीच्या गोळयांचे 7120/- रुपये किंमतीचे पाकीटे जप्त करण्यात आले आहे.
त्यास गोळयांचा पुरवठा करणारे संतोष बालासाहेब जाधव वय 23 वर्षे, व्यवसाय दर्शन मेडीकल लक्कडकोट जालना, रा. वसुंधरानगर जालना, राहुल भागाजी गायकवाड वय 32 वर्षे, विराज मेडीकल गुरु गणेश भवन जवळ जालना यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांना सदरच्या गोळया उध्दव शिवाजी पटारे वय 41 वर्षे, रा. सोमनाथ जळगाव ता.जि. जालना ह.मु सनसिटी जालना हा पुरवठा करीत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळुन आला आहे. त्याने मानवी आरोग्यास हानिकारक डेूेु-05.50 या कंपनीच्या गोळया विनापरवाना विक्री केल्या असल्याचे सांगितले. त्यावरुन सोबतच्या पंचा समक्ष नमुद इसमाचे राहत्या घराची झडती घेतली असता, त्याचे राहते घराचे वरच्या मजल्यावर पलंगाचे बॉक्समध्ये ठेवलेल्या डेूेु-05.50, ॠशीींरिीे, ऋळीश-100, र्डीहरसीर-100 असा प्रतिबंधीत घटक असलेल्या तसेच अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजीत करणारे गोळयांचा अवैध साठा मिळुन आला आहे.
नमुद आरोपीतांचे ताब्यातुन 8,18,400/-रु. किंमतीच्या नशेच्या, गर्भपाताच्या व उत्तेजक गोळयांचे पाकीटे श्रीमती वर्षा महाजन अन्न औषध निरीक्षक, अन्न औषध प्रशासन विभाग जालना यांचे उपस्थितीत जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे 1) अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख रा.शेरसवार नगर जुना जालना 2) संतोष बालासाहेब जाधव वय 23 वर्षे, व्यवसाय दर्शन मेडीकल लक्कडकोट जालना, रा. वसुंधरानगर जालना, 3) राहुल भागाजी गायकवाड वय 32 वर्षे, विराज मेडीकल गुरु गणेश भवन जवळ जालना 4) उध्दव शिवाजी पटारे वय 41 वर्षे, रा. सोमनाथ जळगाव ता. जि. जालना ह.मु सनसिटी जालना या इसमांविरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील दोषी असलेल्या मेडीकल व्यवसायीक यांचे मेडीकल दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी संबधीत विभागास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, यांचे मार्गदर्शनाखाली पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, योगेश उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अमंलदार, रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, जगदीश बावणे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विजय डिक्कर, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, इरशाद पटेल, अक्रूर धांडगे, मपोना/चंद्रकला शडमल्लु, संदीप चिंचोले, किशोर पुंगळे, सचीन राऊत, योगेश सहाणे, सोपान क्षीरसागर, रमेश काळे व चालक गणपत पवार, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.