जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसडीपीआय संघटनेचे धरणे आंदोलन, मुस्लिम समाजाविरोधातले राजकारण बंद करण्याची मागणी

12

जालना । प्रतिनिधी – येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोशल डेमोक्रेटि पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेनं आज दिनांक 6 शुक्रवार रोजी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. मागच्या काही दिवसात काही मशिदींवर हल्ला झाला. मुस्लिम समाजाच्या लोकांवरही हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर भाजपचे काही खासदार मुस्लिम समाजाविरोधात वारंवार वक्तव्य करत आहेत. मात्र मस्लिम आणि हिंदू समाज एकत्र राहत आला आहे. त्यामुळं मुस्लिम विरोधी राजकारण बंद करा या मागणीसाठी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आदोलनावेळी होत असलेली घोषणाबाजी पोलिसांनी थांबवायला लावल्यानं दरम्यान एसडीपीआयच्या कार्यकर्ता
संतप्त झाले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या जाती धर्माचे किंवा संघटनांचे धरणे आंदोलन, मोर्चे, उपोषण असते, त्यावेळी घोषणाबाजी करण्यात येत असतात. त्यांना सर्वांना पोलीस प्रशासनाकडून कोणतेही रोक-थांब करण्यात येत नाही. मग आज एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांना घोषणाबाजीपासून का रोखण्यात आले असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांच्या तसेच मुस्लीम बांधवांच्या वतीने होत आहे. यावेळी मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.