अपघातग्रस्त उसतोड कामगार कुटुंबाला सतीश घाटगे यांनी दिला आधार!

7

घनसावंगी । प्रतिनिधी – बैलपोळा सणाच्या दिवशी बैलजोडी धूत असताना पाय घसरून बानेगाव येथील ऊसतोड कामगार शिवाजी शिंदे (वय 48 ) यांचे गोदावरी नदीत अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवला. शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबाला समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी आधार दिला आहे. शिंदे परिवाराची सांत्वन भेटू त्यांनी आर्थिक मदत केली असून त्यांच्याबासोबत प्रत्येक अडचणीत मदत करण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी दिला आहे.
घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथील शिवाजी शिंदे व त्यांचा परिवार ऊसतोडी करतात. त्याचं कुटुंब दरवर्षी ऊसतोडी करून उदरनिर्वाह करत. ऊस तोडीसाठी घेतलेल्या बैलांना बैलपोळा सणानिमित्त गोदावरी नदीकाठी धूत असताना त्यांचा पाय घसरून गोदावरी नदीत तोल गेला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण बाणेगावावर शोककळा पसरली. सर्व गावातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. याची माहिती गावकर्‍यांनी सतीश घाटगे यांना दिल्यानंतर या दुःखदायी परिस्थितीत शिंदे कुटुंबाला धीर दिला.