परभणीच्या शिवाजी विधी महाविद्यालयाचा कृणाल बेंद्रे विजेता

12

१०० शिक्षकक्लब च्या शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

जालना – भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जालना येथील १०० शिक्षक क्लब तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जि.प.च्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल एका निवेदनाद्वारे घोषित करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक, रोख ५००० रू.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र कृणाल रामेश्वर बेंद्रे (शिवाजी विधी म हाविद्यालय, परभणी) द्वितीय क्रमांक रोख ४००० रू, अदिती अरविंद सुरंगळीकर (बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना) तृतीय क्रमांक रोख ३००० रू. सिद्धी शांतीलाल राऊत (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) चतुर्थ क्रमांक- रोख २००० रू. गायत्री गणेश अंभुरे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे) पाचवा क्रमांक रोख १००० – रू. आकाश दत्तात्रय मोहिते (न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहमदनगर व उत्तेजनार्थ शिवकन्या नवनाथ शिंदे (खोलेश्वर महाविद्यालय, आंबेजोगाई) पल्लवी रामकिसन धनगर (बद्रीनारायण बारवाले म हाविद्यालय, जालना) शुभम एकनाथ शिंदे (अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना) सुषमा आबासाहेब वाघ (प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण) दुपारच्या सत्रात स्पर्धक विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी अन्नदान स्वरूपात उपक्रमशील शिक्षिका श्रीमती अनुजा राऊत यांनी सहकार्य व मदत केली. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त
९५ स्पर्धकांची नोंदणी
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक आर.आर. जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख, प्राचार्य धम्मरत्न वायवळ, विस्तार अधिकारी सुभाष भालेराव, अभियंता एस.एन. कुलकर्णी, जमीर शेख, राजेभाऊ मगर व डॉ. शिवनंदा मेहेत्रे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी एकुण ९५ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परीक्षणासाठी परीक्षक म्हणून प्रा. जालींदर बटुळे, डॉ. रामदास निहाळ, अॅड, सौरभ औटे, डॉ. मंगल मुळे व सीमा सरपोतदार यांची निवड करण्यात आली होती. अशी माहिती संयोजन समिती अध्यक्ष राजेभाऊ मगर व संदीप इंगोले यांनी दिली.
आदर्श शिक्षक जमीर शेख यांच्या सेवानिवृत्तीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी राजेभाऊ मगर, दत्तात्रय राऊतवाड, संतोष लिंगायत, संदीप इंगोले, तुकाराम काकडे, माया कवानकर, मनीषा पाटील, कविता दाभाडे,
ज्योती जोशी, शुभांगी लिंगायत, अश्विनी खंडागळे, प्रभा जाधव, विष्णू बिरादार, प्रदीप घाटेशाही, चंद्रकांत धोत्रे, रामेश्वर धोपटे, सचिन सुरडकर व अमोल कंडारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अप्पासाहेब मुळे यांनी तर आभार संदीप इंगोले यांनी मानले.