परतुर व मंठा येथे महिला बचत गटांच्या कार्यालयासाठी नवीन इमारत उपलब्ध करून देण्याची आमदार लोणीकरांचे आश्वासन

22

जालना । प्रतिनिधी – भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत महाराष्ट्र राज्यात चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून परतूर विधानसभा मतदार संघात अठरा हजार घरकुल बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यात 3 कोटी घरे बांधण्यात येतील. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
मोरंगेश्वर मंगल कार्यालय आष्टी ता. परतुर जि. जालना येथे सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र, आष्टी संचलित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण आभियान अंतर्गत महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जालना अंतर्गत महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व जाणिव जागृती आभियान वार्षिक सर्वसाधारण सभा, उत्तकृष्ट कार्य करणार्‍या बचतगट / महिलांना गौरव सोहळा आणी महिलांची आरोग्य तपासणी शिबीर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तळणी विभागातील 450 बचत गटात 5300 महिला असून मंठा विभागातील 312 बचत गटात 3200 महिला आहे. राष्ट्रीय भागातील 304 बचत गटात 3510 महिला तर परतूर विभागातील 453 बचत गटात चार हजार सहाशे महिला आहेत. अशा एकूण परतूर विधानसभा मतदारसंघात मंठा व परतूर तालुक्यातील 1519 महिला बचत गटात एकूण सोळा हजार सहाशे महिला असून तळणी विभागाला 12 कोटी मंठा विभागात आठ कोटी आष्टी विभाग 13 कोटी परतुर विभाग 17 कोटी असे एकूण 50 कोटी रुपये कर्ज या आर्थिक वर्षात वाटप झाले असून आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते अष्टविभागातील महिला बचत गटांना आज 13 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. याप्रसंगी बचत गटांच्या उपस्थित हजारो महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी गणेश महाराज शत्रूघन कणसे संपत टकले रवी सोळंके सुदाम प्रधान तुकाराम सोळंके प्रदीप ढवळे सिद्धेश्वर केकाण बाबाराव थोरात मधुकर मोरे विष्णूकाका शहाणे अमोल जोशी जिजा शिंदे बाळासाहेब लहाने गणेश सोळंके रावसाहेब आढे आण्णासाहेब ढवळे कृष्णा टेकाळे नसरूल्लला काकड रमेश थोरात उमेश सोळंके मारोती थोरात रफिक भाई आसिफ कच्छी छत्रपती थोरात नागेश ढवळे सुरेश जगताप अमोल पवार उपविभागीय अधिकारी गायकवाड तहसीलदार प्रतिभा गोरे गटविकास अधिकारी पंचायत समिती परतूर तांगडे, अग्रनी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नाबार्ड जालना तेजस क्षीरसागर जिल्हा उद्योग केंद्राची जगदीश जगताप जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते व्यवस्थापक श्रीमती सुषमा कुलकर्णी कार्यकारी संचालक मंडळाच्या जाईबाई धोंडीबा मोरे मंदाकिनी गरीबदास डोळस प्रेमला शिवाजी तौर शोभा बाबुराव शेळके संगीता विश्वम्भर चौघुले शालनबाई बाबुराव मोटे रेखा अनिस मोरे विजयमाला कालिदास मोरे लक्ष्मी नामदेव देवकर शोभा पंडित ढवळे गोदावरी प्रभाकर सोळंके केसर राजेभाऊ वाहुळे ग्रीष्म हनुमान वक्ते मनीषा शेषराव लहाने सुदामती जालींदर बाण विजयमाला विनायक शिंदे विमल लक्ष्मण भांडवले चिंगुबाई सिताराम विमल भीमराव गायकवाड छाया अंबादास शिंदे संगीता राधाकिसन खरात सुनीता अशोक वालेकर पुष्पा प्रकाश सोळंके नाणी आबासाहेब अहवाल मनीषा सोळंके कमाल माणिक भागडे उर्मिला वसंत जगताप शितल आंधळे सागर बबन रोडे यांच्यासह महिला बचत गटातील हजारो महिलांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेबाबत पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की बालसंगोपन योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवार्‍याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलं मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा आहे.
सदर योजना ही संस्थाबाहय योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना थेट संगोपनाकरिता महाराष्ट्र राज्य सरकार प्रती माह प्रती लाभार्थी दोन हजार दोनशे रुपये यवढे अर्थसहाय्य देते. अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्यांची मुले या योजनेचा लाभ घेतात. प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे गृहचौकशी करुन संबंधित बाल कल्याण समितीस अहवाल सादर करतात. त्या अहवालाच्या आधारे बाल कल्याण समितीकडून दाखल आदेश घेवून लाभार्थ्यांस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे मार्फत बालसंगोपन या योजनेचा लाभ देण्यात येतो. शासन निर्णयान्वये बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे.
या योजने चा लाभ परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा परतूर जालना तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने लवकरच अनाथ बालक पालक मेळाव्याचे आयोजन आपण करत आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बाबत पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येणार असून ही योजना काहीही झाल तरी बंद पडणार नाही. त्या करीता राज्यात पुन्हा महायुती च सरकार सत्तेत असणं गरजेच आहे.