महादिप संवाद चाचणी स्पर्धेत शिंगोणा शाळेच्या विद्यार्थींचे यश

20

परतूर । प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्रा शाळा शिंगणा येथे दि.30, ऑगस्ट 2024, रोजी महादीप संवाद अंतर्गत केंद्रस्तरीय चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
या चाचणीसाठी परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शिगोणा, हातडी, वलखेड, शेवगा, या चार शाळेनी गंज केंद्रातून सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद प्रा शाळा शिंगोणा येथे केंद्रस्तरीय महादीप संवाद ही स्पर्धा केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.
स्पर्धेत शिंगोणा शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले ऋतुजा सोळंके. अनुष्का सोळंके.पायल गरड. विनायक कदम.खुशी गरड. हे विद्यार्थी केंद्र स्तरातून तालुका स्तरावर चाचणीसाठी पात्र झाले. सदरील चाचणीमध्ये 5 वी ते 8 वी वर्गातून गुणाानुक्रमे प्रत्येक वर्गातून 3 विद्यार्थी तालुकास्तरीय चाचणीसाठी निवड करण्यात आली. गेल्या तीन वर्षा अगोदर जिल्हा परिषद प्रा शिंगोणा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मालदीप संवाद चाचणी स्पर्धेत यश प्राप्त करून सहलीला जाण्याचा मान मिळविला होता. यावेळी चाचणी केंद्र प्रमुख बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.हि चाचणी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आर. एम. सावंत. डी. आर.लहाने.श्रीमती, अमृता सोईतकर. कैलास पाईकराव. कैलास उफाड.श्रीमती, मनीषा मुंडे.यांनी विशेष प्रयत्न केले.