जालना । प्रतिनिधी – नुकतेच बदलापूर व कलकत्ता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना त्यांच्या हक्काबद्दल जाणीव करुन देण्यासोबत त्यांना स्वंरक्षणाचे धडे सुद्धा इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन तर्फे प्रशासनाचे सहभाग घेऊन दिले जाणार असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा अॅड. अश्विन महेश धन्नावत तथा सचिव अॅड. पिंकी लड्ढा यांनी दिली. मुलींना महत्वाचे फोन नंबर जसे पोलीस हेल्पलाईन, दामिनी पथकांचे संपर्क नंबर दिले जाईल तथा प्रत्येक शाळेत मुलींचीच एक समिती गठीत केली जाण्यासाठी प्रयत्न केले जाईल, ज्यामध्ये मुली त्यांच्या अडचणी या समितीच्या सदस्यांना मोकळ्यापणाने सांगु शकतील व या समितीच्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी क्लब मार्फत दिले जाईल. सध्या क्लब तर्फे चांगले व वाईट स्पर्श संदर्भात मार्गदर्शन सुरु आहे.