जालना । प्रतिनिधी – समृध्दी महामार्गावर समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.
टाटा सुप्रो मिनी पिकअप वाहन क्रमांक चक 15 कक 8434 चालक उमेश भीमराव बनसोड रा. शिवाजीनगर नाशिक हे नाशिक ते अमरावती जात असतांना समृध्दी महामार्ग नागपूर करिडार चनल क्रं.374 वर नजीक पांगरी शिवारात दि.22 गुरूवार रोजी पहाटे चार वा. च्या सुमारास वाहनावरील ताबा सुटल्याने समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकून अपघात झाला आहे. वाहन चालक उमेश भीमराव बनसोड जागीच ठार झालेला आहे असे अम्बुलन्स मधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक आर के निकम,पो.काँ.ठोंबरे,पो.काँ.परसुवाले, निखिल बोडखे,लहू जाधव ई. नी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.
पोलीसांनी वाहन चालकास तात्काळ समृद्धी म्बुलन्स मध्ये टाकून सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून अपघात ग्रस्त वाहन हायड्राच्या साह्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघात ग्रस्त वाहनांमध्ये ड्रॅगन फूड ,आलु, बुखरा हे फळे असून सदर अपघातग्रस्त वाहन समृद्धी हायड्राच्या साह्याने एडमिन बिल्डिंग येथे आणून उभे केले आहे तसेच मयताच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले आहे व सदर वाहनांमध्ये फळे असल्यामुळे फळ मालकाला फोन करून तात्काळ सदर माल घेऊन जाण्याचे सांगितले असून त्यांचे वाहन येत आहे.महामार्ग पोलीसांनी बदनापूर पोलीस ठाणे व कंट्रोल रूम जालना यांना अपघाताची माहिती दिली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.