छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदी आदेशपालसिंग छाबडा यांची फेरनिवड, तर महासचिवपदी शामसुंदर लोया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या व्यापारी संघटनाची शिर्ष संघटना मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या सर्वसाधारण सभेचे रविवारी दि. 18 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ट्रेड अँड एग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, सत्यनारायण लाहोटी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल मालाणी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष तनसुख झांबड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल द ओरेस येथे ही बैठक घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी आदेशपालसिंग छाबडा यांची फेरनिवड, तर महासचिव पदी जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारी सचिव शामसुंदर लोया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष पदी विकास साहुजी, माजी अध्यक्ष प्रफुल मालाणी, सीनियर उपाध्यक्षपदी सुरेंद्र रेडासनी, उपाध्यक्ष पदी गजानन घुगे, सूर्यकांत हाके, लक्ष्मीकांत राठी, संजय मोदानी, सचिव पदासाठी संतोष कावळे पाटील, जफर मिर्झा, तर सहसचिव पदी संजय दाड व संदीप लाहोटी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन संचालक मंडळाचे सर्व व्यापारी वर्गात अभिनंदन होत आहे.
यावेळी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. यात विनीत साहनी, सुभाष लदनीया, अनंत रुद्रवार, नितीन वट्टमवार, सुरेश तांबे, चंपालाल लोढा, भास्कर जाधव, धनंजय जेवलीकर, ज्ञानेश्वर उगले, पवन लोहिया, सुदर्शन कांडी, राजेंद्र बनसोडे यांचा समावेश आहे.