“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना” बँक खाते आधार सिडींग, त्रुटींची पुर्तता करुन अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

20

जालना  – जालना जिल्ह्यातील “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण” योजनेकरीता अर्ज केलेल्या सर्व लाभार्थीना जाहिर आवाहन करण्यात येते की, आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेड (Adhar Seeding) आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. बँक खात्याला आधार सिडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

डिबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थीना जुलै -2024 पासून दरमहा 1500/- रुपये लाभ मिळणार आहे.

1 जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थीना 17 ऑगस्ट रोजी थेट डिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचा लाभ जमा होणार आहे. 1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन सप्टेंबर 2024 अखेर पर्यंत पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ देण्यात येईल.

 त्रुटींची पुर्तता करुन अर्ज पुन्हा दाखल करण्याचे संबंधितांना आवाहन

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचतगट अध्यक्ष,  बचतगट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका / मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका (मुख्यसेविका), सीएमएम, मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅपमधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे त्यामुळे पात्र (Approved)/अंशत: रद्द (Disapproved), प्रलंबित (Pending), रद्द (Rejected) असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुध्दा आपल्याला पाहता येतील.

सर्व संबंधीतांनी अंशत: रद्द (Disapproved) असलेले सर्व लाभार्थीना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण  व्हियु रीजन (View Reason) हे टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून एडिट फॉर्म (Edit Form) हे टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म सबमिट (Form Submit) करावा. यामध्ये फक्त फॉर्म एकदाच दुरुस्त (Edit) करता येईल, याची नोंद घ्यावी. दि. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत जालना जिल्हयातील 12 हजार इतके अंशत: रद्द (Disapproved) केलेल अर्ज त्रुटींची पूर्तता करुन ऑनलाईन रीसबमिट करणे प्रलंबित आहेत. तरी सर्वांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करून अंशत: रद्द (Disapproved) अर्ज  रीसबमिट (Resubmit) करावे, जेणे करून त्यांची पडताळणी करून पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोईचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधितांना केले आहे.