शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी

72

जालना । मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात अनेक मंडळात अतिवृष्टी होवून शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या अनुषंगाने आज १४ ऑक्टोंबर रोजी जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील बाजी उम्रद, जळगाव येथील शेतक-यांच्या बांधावर जावून पाहणी केली.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होवून शेतक-यांचे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, मोसंबी, डाळींब आदीं पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळींच्या तोंडावर हिरावला गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेल्या शेतक-यांच्या व्यथा अंबेकर यांनी जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेवून शेतक-यांच्या समस्या व अतिवृष्टीने झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगून नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे अंबेकरांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, माजी पंचायत समिती सभापती मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नारायणराव डोंगरे, युवासेनेचे शिवाजी शेजुळ, नागोराव थेटे, बाबासाहेब डोंगरे, राजेंद्र जाधव, एकनाथ डोंगरे, बालाजी डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, चांगदेव डोंगरे, माधवराव गायकवाड, आसाराम सवडे, गणेश सवडे, दिपक डोंगरे, कृष्णा डोंगरे, भगवान निंबाळकर, गणेश पडूळ, राजु राऊत, विष्णु डोंगरे, बालाजी डोंगरे, तुकाराम खेत्रे, निवृत्ती शिंदे, अर्जुन डोंगरे, माधव गायकवाड, नाथा गायकवाड, सखाराम डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतक-यांची उपस्थिती होती.