जालना । प्रतिनिधी – मराठा समाजाच्या मुलांचं मनोज जरांगेंमुळं मोठं नुकसान झालं असून ईडब्लूएस आरक्षण हे जरांगेंमुळं गेलं असा आरोप ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. वाघमारे यांनी आज दि.3 शनिवार रोजी शहरातील लेक व्ह्यू हाटेल येथे दुपारी 12 वा. च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना नोकरीत मुकावं लागलं ते फक्त जरांगेमुळं झालं आहे. त्याचबरोबर जरांगेंमध्ये धमक नसून 288 उमेदवार उभा करायचा जरांगेंचा बार फुसका असल्याचंही वाघमारे यांनी म्हंटलंय. दरम्यान राज्यकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यायला नाही पाहिजे असं वाघमारे यांनी म्हंटलं असून जरांगेंना पाठिंबा देणार्या आमदारांना आम्ही पाडण्यासाठी ताकद लावणार आहोत असंही वाघमारे यांनी म्हटले आहे.