चातुवर्ण विचारधारा व्यवस्थेच्या भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्याविरुध्द काँग्रेस पक्षाचे आक्रमक आंदोलन विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांचा अपमान कदापि सहन करणार नाही!

9

जालना । प्रतिनिधी – देशात जात निहाय जनगणना करण्यास कटिबध्द असलेले काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोध पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना संसदेत चार्तुवर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी श्री. गांधी यांची जात विचारुन अपमान केल्याप्रकरणी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवार रोजी जुना जालना गांधी चमन येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण राज्यात गुरुवार रोजी भाजपच्या या चातुवर्ण व्यवस्थेच्या विचारधारे विरुध्द काँग्रेस पक्षाच्यातीने जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे खा. अनुराग ठाकूर आणि भाजपाच्या जातीयवादी विचारांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आ. कैलास गोरंट्याल यानी खा. राहुल गांधी यांच्याविषयी भाजपाने त्यांच्या जातीचा उल्लेख करुन अपमानीत केल्याबद्दल निषेध व्यक्त करुन खा. ठाकूर यांनी जाहीर माफी मागावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख हमेमूद बोलतांना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष ा. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये चातुवर्ण व्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. खा. राहुल गांधी हे देशातील प्रत्येक जातीधर्मातील लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी जातीय जनगणना व्हावी म्हणून आक्रमकपणे लोकसभेत बाजू मांडत असतांना भाजपाचे जातीयवादी खा. अनुराग ठाकूर यांनी श्री. गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल देशातील लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. भाजपाने केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुध्दी असे आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, यांनी आपल्या भाषणातून जातीयवादी खा. अनुराग ठाकूर यांच्या निषेध व्यक्त करुन खा. राहुल गांधी यांच्या जातीय जनगजगणा व्हावी या मागणीला जोरदार पाठींबा दिला. यावेळी शहराध्यक्ष वैभव उगले, डॉ. विशाल धानुरे, राजेंद्र गोरे, बासेद कुरेशी, राधाकिसन दाभाडे, स. अझहर, युवक काँग्रेसचे शेख वसीम, शेख शमशाोद्दीन, प्रमोद आल्हाट, आनंद वाघमारे, योगेश पाटील, रघुवीर गुडे, नारायण वाडेकर, फकीरा वाघ, ज्ञानेश्वर डुकरे, स. रहिम तांबोळी, मंगलबाई खांडेभराड, चंदाताई भांगडीया, मंदा पवार, विभा लाखे, जावेद शेख लकी, गणेश चांदोडे, शेख वसीम कादरी, बाबासाहेब सोनवणे, जावेद अली, अन्सार कुरेशी, संतोष कलाणी, शेख अलीम, शेख निजाम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.