देवमुर्ती येथील काँग्रेस पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश, कुणावरही अन्याय होणार नाही – अर्जुनराव खोतकर

46

जालना । प्रतिनिधी – शिवसेना पक्षात कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश सोहळा पार पडत आहे. तरी देखील कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्‍वासन माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी येथे दिली. ते देवमुर्ती येथील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळ्या दरम्यान बोलत होते. प्रसंगी श्री खोतकर यांनी सर्वांचा सत्कार केला.
यावेळी पुढे बोलतांना श्री खोतकर म्हणाले की, शिवसेनेत कसल्याही प्रकारचा भेदभाव केल्या जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहे. सर्वच जातीधर्मांतील युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. असे असले तरी कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाहीही श्री. खोतकर यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य पाहुनच अनेक जण शिवसेनेत प्रवेश घेण्याच्या मन:स्थितीत असल्याचेही श्री. खोतकर म्हणाले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख पंडीतराव भुतेकर, युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, अ‍ॅड. अशपाक पठाण, शिवाजी शेळके, सुनिल रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. याप्रंसंगी ग्रामपंचायत पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर माऊली जाधव सय्यद कयूम हाजी उपसरपंच सय्यद हारुण हाजी (पहेलवान), सय्यद महेमूद (पहेलवान), शेख हसमुद्दीन हाजी (पहेलवान), संभाजी जाधव (माजी सरपंच), ग्रामपंचायत सदस्य कृष्णा जाधव, रामचंद्र फुलझाडे (माजी जि. प. सदस्य), माजी पंचायत समिती सदस्य श्रीमंतराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चव्हाण, जगन्नाथ फुलझाडे , अमोल जाधव, अंकुश चव्हाण, कैलास जाधव, ज्ञानेश्वर फुलझाडे, शामराव फुलझाडे, प्रकदीम म्हस्के, साहेबराव फुलझाडे, कृष्णा कदम, बळीराम चव्हाण, रमेश कदम, सय्यद कलीम, सय्यद सलीम, सय्यद अन्वर (पहेलवान), बाबु सय्यद, अफसर सय्यद (पहेलवान), सय्यद रहिम, सय्यद रफीक, सय्यद अहेमद, सय्यद सिद्दीक (पहेलवान), सय्यद मोईन (पहेलवान), सय्यद नुरखान, पठाण शब्बीरभाई, शेख नुरोद्दीन(पहेलवान), सय्यद अल्ताफ, सय्यद अशपाक, सय्यद जंगू (पहेलवान), सय्यद खालील , शेख अमीन, सय्यद अलीमभाई, सय्यद सलीमभाई, साहेबराव फुलझाडे, बळीराम चव्हाण, जावेद पठाण, अकील पठाण, अशफाक शहा, कडु शहा, महेबुब शहा, मसुर शहा, सय्यद एजाज, ईस्माईल सय्यद, समद शहा, रजादेक शहा, सौफियान पठाण, शौकत शहा, राजुभाई पठाण, शेख अमिर, शेख अमर, शेख अब्बु, शेख कलीम, शेख तालीब, पठाण आरुण, शेख मोसीन, शेख अमीन, शेख शरीफ, सय्यद आतिकभाई, सय्यद कैसर, सय्यद अक्रम, फैजल पठाण, शेख रहेमान, शेख इम्रान, शेख मुज्जमील, शेख सोएल, शेख अशफाक, सय्यद खलील, आदींनी यावेळी श्री. खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी गावकरी तसेच शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.