जालना । मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांच्या पैसे देवाणघेवाण संभाषणाच्या ऑडिओ क्लिप मधील घटनांची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.
याबाबत प्रसार माध्यमांशी बोलतांना डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांच्या पैसे देवाणघेवाणीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारला आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि तथाकथित तत्कालीन’ समन्वयक’ हॅंडलर ना. चंद्रकांत पाटील यांना जर स्वच्छ मनाने मराठा आरक्षण द्यायचे होते तर समन्वयकांना पैशाचे वाटप करत करोडो करोड मराठा समाज बांधव _ भगिनी यांचे आंदोलन फोडण्यासाठी पैसे देण्याची व्यवस्था केली असल्याचे उभय समन्वयकांच्या संभाषणात स्पष्ट होते. तसा वारंवार उल्लेख समन्वयकांच्या संभाषणात आला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील यांनी बैठकीसाठी समन्वयकांना मॅनेज करून मराठा समाजाला खोटे, घटनेच्या चौकटीवर न टिकणारे, अधिकारात’च नसलेले, न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची अक्षम्य फसवणूक केली आहे हे नक्की.! आणि त्यासाठी हा पैसा ‘ पेरणी’ उद्योग केला असल्याचे डॉ. लाखे पाटील यांनी म्हटले आहे. ठोक समन्वयक मॅनेज करून मराठा समाजाची फसवणूक करण्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी करीत या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली सखोल चौकशी करावी, अशी मागणीही डॉ. लाखे पाटील यांनी केली आहे.