जालना । पृथ्वीवरील सर्व मानव एकाच पालकाची संतान आहे. रक्तात जात नसते. माणसाला रक्ताची गरज भासल्यावर तो त्याची जात बघत नाही. तसेच डॉक्टरही त्याची जात विचारात नाहीत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी हाच मानवता सेवेचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिंद जालनाचे सचिव सय्यद शाकीर यांनी येथे केले.
प्रेषित मुहम्मद पैगंबर सल्लम बारा रब्बी- उल- अव्वल निमित्त जमात-ए-इस्लामी हिंद जालना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला होते. यावेळी ते बोलत होते.
या शिबिरात 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात नूर हॉस्पिटल बदनापूर आणि सामान्य शासकीय रुग्णालय जालना यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जमात -ए-इस्लामी हिंदचे शेख मुजीब, शेख इस्माईल , नसीमुद्दीन सिद्दीकी, अब्दुल हमीद, सय्यद शाकीर ,सय्यद फरान, डॉ. मुसअब ,काझी गालिब ,एजाज खान, वसीम अन्सारी, सुफियान खान, शेख इब्राहिम, मिर्झा शाहिद ,शेख वहीद कादरी, सय्यद मुसाब, हाफिज जुबेर, हाफिज अमीर यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरामध्ये नूर हॉस्पिटल ब्लड बँकचे डॉक्टर दिनेश कुमार भद्रे (रक्त संक्रमण अधिकारी) आणि डॉक्टर प्रतिमा भद्रे, डॉक्टर राहिला शेख (रक्त संक्रमण अधिकारी) शेख मौला अहमद (इन्चार्ज ब्लड बँक) शेख अब्दुल अलीम, सय्यद जमील,शकील भाई, नाझीम भाई पटेल ,तय्यबा शेख, मुस्ताक भाई, एजाज भाई, राहुल निकाळजे, लतीफोदि्दन सिद्दिक़ी, अब्दुल अजीज, शेख जाहिद, युसुफ भाई आणि सिविल ब्लड बँकेच्या सपना परदेसी, मिलिंद अंभोरे, महानंदा हरदेकर, नितीन जाधव, सतीश बोराडे, सनी घोडेकर, लहू उगले, राजू राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.