परतूर | प्रतिनिधी – भारतातील तमाम अहिल्या भक्तांना आवाहन करतो की ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे.प्रत्येक गावातील बांधवांनी व अनुयायांनी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करावी.यावर्षी प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या जोरदार साजऱ्या झाल्या आहेत. राजमाता अहिल्यादेवीचे विचार व कार्य जगासमोर आले पाहिजे व आपला इतिहासही समाजास समजला पाहिजे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे .तसेच यातून समाजामध्ये वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होणार आहे.त्याबरोबर सरकारी परिपत्रकानूसार प्रत्येक शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यासाठी आपापल्या गावातील बांधवांनी व अनुयायांनी प्रयत्न केला पाहिजे .
राजमाता अहिल्यादेवी जयंतीदरम्यान चांगल्या लोकांची व्याख्याने आयोजित करा. त्यातून होळकरांचा इतिहास समोर येऊन समाज जागृती झाली पाहिजे .तसेच स्पर्धा परीक्षा, प्रबोधनपर, महिला जागृती, युवा प्रेरणा, आनंदी जीवन व मानव ,माणसानी जगावे कसे व कशासाठी ,शिक्षण – संस्कार आणि आजची तरुण पीढ़ी , युवकांनी उद्योजक बनावे इ.विषयी व्याख्याने आयोजित करा.
31मे रोजी प्रत्येकाने आपल्या घरी राजमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करावे .गावात अथवा मंदिरात पुतळा असल्यास अभिवादन करावे.सर्वत्र सगळे जयंती ,महोत्सव निश्चितपणे मोठ्या प्रमाणात साजरी करतातच.पण या दिवशी वेगळा उपक्रम म्हणून सामाजिक कार्य अथवा दानधर्म करा.अहिल्यादेवीनी दानधर्म मोठ्या प्रमाणात केला. आपणही आपल्या व्यवसायातील नफ्याच्या 1%तरी दानधर्म करा. अहिल्यादेवीनी फार मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून झाडे जगवली.आज ऊनामुळे मनुष्य-प्राणी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वृक्षरोपण करून झाडे जगवण्याचा प्रयत्न करा.शाळेमध्ये गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करा .पशुपक्षी , निष्पाप जनावरे, शेळ्या , मेंढ्याची सेवा करा. गोरगरीब लोकांना अन्नदान करा .युवक -युवतीना सुरक्षाबाबत मार्गदर्शन करा. व्याख्यानमाला आयोजित करा इ. अशाप्रकारे जयंती साजरी झाल्यास आपला आदर्श अन्य समाज घेईल व समाजामध्ये वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल.काही गावांत पुरणपोळी करुन सणाप्रमाणे जयंती साजरी केली जाते. आपणही आपल्या घरी पुरणपोळी चा स्वयंपाक करा, घरासमोर रांगोळी काढून, पाच दिवे लावा घरावरती पिवळा झेंडा होळकरशाहीचे “बांड” निशाण घरावर फडकवून जयंती साजरी करा.मुलांना सुट्टी असलेने चंद्रगुप्त , यशवंतराव होळकर , अहिल्यादेवी होळकर , महान लोकांची आत्मवृत्ते इ. पुस्तके वाचण्यास द्या. तसेच चौडी या ठिकाणी सहल आयोजित करा.अहिल्यादेवीच्या विचारांचे पोस्टर बनवून प्रबोधनपर मिरवणूक काढा .असे आवाहन हनुमंत दवंडे मौर्य क्रांती महासंघ जिल्हाध्यक्ष जालना यांनी केले आहे.